अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बरळलेत. अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक असून सामाजिक संस्था ती चूक दुरुस्त करतात असं धक्कादायक विधान पार्सेकर यांनी केलंय.

Updated: Jan 23, 2015, 01:38 PM IST
अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बरळलेत. अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक असून सामाजिक संस्था ती चूक दुरुस्त करतात असं धक्कादायक विधान पार्सेकर यांनी केलंय.

गोव्यातल्या मडगाव इथं डिसेबिलिटी राईट असोसिएशनच्यावतीने वी केअर या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.. या महोत्सवाच्या उदघाटनावेळी पार्सेकरांनी हे धक्कादायक विधान केलंय.

यावेळी अपंगांना त्यांच्यातील क्षमता स्पष्ट करून धीर देण्याऐवजी त्यांना सरळ देवाची चूक म्हणून पार्सेकरांनी हिणवलं...याय कार्यक्रमात डिसेबिलिटी राईट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय.

अपंगत्व ही देवाची चूक नसून देवाने आपल्या क्षमता दाखवण्यासाठी त्यांची निर्मिती केली असल्याचे ड्रॅगचे अध्यक्ष अवलिनो डिसा यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.