भारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!

इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय. 

Updated: Sep 9, 2015, 03:15 PM IST
भारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा! title=

मुंबई : इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय. 
 
जगभरात पसरलेली इसिसची दहशत भारतीयांसाठीही चिंतेचा विषय ठरलाय. यावर, गेल्या काही महिन्यांमध्ये मुस्लीम विद्वान आणि नेत्यांचे फर्मान एकत्र केल्याचं मुंबईच्या 'इस्लामिक डिफेन्स सायबर सेल'चे अध्यक्ष अब्दूर रहमान अंजारिया यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा - ‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...

यावेळी, त्यांनी या दहशतवादी समूहाला समूळ नष्ट करण्यासाठी तत्काळ पावलं उचलली जावीत, अशी आंतरराष्ट्रीय समुदायकडे मागणी केलीय. गेल्या अनेक महिन्यांपासून या क्रूर दहशतवादी संघटनेनं अनेक ठिकाणी अशांती निर्माण केलीय तसंच दक्षिण आशियाई क्षेत्रावर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

हा फतवा 15 भागांमध्ये जारी करण्यात आलाय. तसंच याच्या प्रती संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून तसंच इतर अनेक नेत्यांना पाठवण्यात आल्यात. या फर्मानात आपण इसिसच्या अत्यंत क्रूर अशा कृत्यांना भारतीय मुस्लीम अजिबात पाठिंबा देत नसल्याचं म्हटलं गेलंय.

अधिक वाचा - नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

अंजारिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, 1050 हून जास्त भारतीय इस्लामी विद्वान आणि धर्मगुरुंनी आयएसविरुद्ध फतवा जारी केलाय... तसंच ही संघटना 'गैर इस्लामी आणि अमानवीय' असल्याचंही यात म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.