बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी

बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. 

Updated: Sep 9, 2015, 03:06 PM IST
बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी title=

नवी दिल्ली: बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. 

बिहारमध्ये ५ टप्प्यात मतदान

बिहारमध्ये ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १२ ऑक्टोबर, दुसरा १६ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर १ आणि ५ नोव्हेंबरला चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होईल. तर ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक

बिहार निवडणुकीत निवडणूक आयोगानं महत्त्वाची सुरूवात केलीय. आता बिहार निवडणुकीत इव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नाव आणि चिन्हासह फोटोही दिसणार आहे. तर प्रत्येक मतदान केंद्रावर CRPF जवान तैनात असतील. 

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महत्त्वाचे मुद्दे- 

  • बिहार विधानसभा निवडणूक
  • २९ नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपणार
  • ६.६८ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
  • बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी ४३ जागा एससी,
  • २ जागा आदिवासींसाठी राखीव
  • पाच टप्प्यात होणार निवडणूक
  • ४७ मतदारसंघ संवेदनशील
  • नवरात्री, दिवाळी सण पाहता ५ टप्प्यात निवडणूक
  • EVM मशीनमध्ये उमेदवारांचे फोटो
  • बिहारमध्ये आजपासून आचारसंहिता लागू
  • सुरक्षेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर CRPF जवान तैनात
  • १२ ऑक्टोबरला मतदानाचा पहिला टप्पा
  • १६ ऑक्टोबरला दुसरा, २८ ऑक्टोबरला तिसरा टप्पा
  • बिहारमध्ये १ नोव्हेंबरला चौथा टप्पा आणि ५ नोव्हेंबरला अखरेच्या ५ व्या टप्प्यातील मतदान
  • ८ नोव्हेंबरला मतमोजणी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.