यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग!

मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

Updated: May 21, 2015, 04:23 PM IST
यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग! title=

मथुरा: मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

याकामी एअरफोर्सच्या मिराज-2000 या कॉम्बॅट विमानानं सहभाग नोंदवला आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला. एअरफोर्सचं हे विमान दोन वेळा एक्सप्रेस वेवर उतरवलं गेलं. विमान सकाळी 6.45 वाजता उतरलं. ही चाचणी आपात्कालीन स्थितीत लढण्यासाठी घेतली गेली. 

ही एक ट्रायल लँडिंग होती. विमान मिराज लढाऊ विमान आहे. एक मिनीट हे विमान एक्सप्रेसवेवर होतं. त्यानंतर जाण्यासाठी विमानानं पुन्हा उड्डाण केलं. विमान लँडिंगमुळे एक्सप्रेस वेवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.