'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'

गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

Updated: Jul 26, 2014, 10:21 AM IST
'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही' title=

पणजी : गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

भारत हे आत्ता हिंदू राष्ट्र आहे आणि यापुढेही हिंदू राष्ट्र म्हणूनच ओळखले जाईल, असं वादग्रस्त वक्तव्य डिसुझा यांनी केलंय. 'भारत हा हिंदू देश आहे. भारत म्हणजे हिंदुस्थान... माझ्यासह हिंदुस्थानातले सगळे भारतीय हे हिंदूच आहेत. मी ख्रिश्चन हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र बनवण्याची गरजच नाही', अशी मुक्ताफळे डिसुझा यांनी उधळलीत...

बिकीनीवर बंदी घालण्याचे मत महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलं होतं. तर पंतप्रधान मोदी एक दिवस भारत हे हिंदू राष्ट्र बनवतील, असे तारे त्यांचे बंधू आणि गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी तोडले होते. त्यात आता गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी भर टाकलीय.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवतील' असं वादग्रस्त वक्तव्यं दीपक धावलिकर यांनी केलं होतं. याच वक्तव्यावर धावलीकर यांचा बचाव करताना डिसूजा यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणार्‍या ठरावावर गोवा विधानसभेत बोलताना डिसुझा म्हणाले की, आपण सर्वच जर मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर भविष्यात भारत खर्‍या अर्थाने हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, असा मला विश्‍वास आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.