नवी दिल्ली : कारगिल विजयाला आज बरोबर 15 वर्ष पूर्ण झालेत. हा दिवस 'कारिगल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो.
शनिवारी (आज) सकाळी नवी दिल्लीच्या इंडिया गेटवर सकाळी संरक्षण मंत्र्यांनी सेनेच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसहीत कारगिलच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
शुक्रवारी, द्रासमध्ये कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंह यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या शहीदांच्या आठवणीत बनविल्या गेलेल्या वॉर मेमोरिअलमध्ये शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जुलै 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानला भारतानं धडा शिकवला होता... त्याचीच ही आठवण... भारतीय सेनेनं कारगिलमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी सेना आणि घुसखोरांचा खात्मा केला होता. त्यामुळेच हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो. शुक्रवारी द्रास वॉर मेमोरिअलमध्ये तिरंगा फडकावत शहीदांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला गेला. या जवानांना आपल्या प्राणाची आहुती देत भारताला सुरक्षित ठेवलं होतं.
जनरल विक्रम सिंग यांनी कारगिल युद्धाच्या वेळी सेनेचे प्रवक्ते म्हणून महत्त्वाची जबाबदारी पेलली होती.
कारगिल पर्वतराजीवर कायमस्वरुपी ताबा मिळावयचा, याच इराद्यानं पाक सैनिक घुसले होते... सिंधू नदी आणि श्रीनगर - लेह हायवे काबीज करण्याचा त्यांचा उद्देश होता आणि तशीच व्यूहरचना करून हे सैनिक बसले होते.
मात्र, भारतीय सैन्याच्या पायदळाने बोफोर्स तोफांसह आघाडी सांभाळली आणि कारगिलमधून शत्रूला हुसकावून लावलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.