इबोला वायरसच्या धोक्याने भारत हादरला

Updated: Aug 11, 2014, 08:19 PM IST
इबोला वायरसच्या धोक्याने भारत हादरला title=

चेन्नईमध्ये इबोला वायरसचा एक संशयित रूग्ण आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देशातला प्रत्येक भागातला आरोग्य विभाग हादरला आहे.  मुळात या रुग्णाला इबोला झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण छत्तीसगढ़मध्ये इबोला प्रकरणावर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्य़ानी वेगवेगळे वक्तव्य दिले आहेत. या वरून असं दिसतं की आरोग्य विभाग याबाबत किती गंभीर आहे.

इबोला वासरसचा धोका बघता केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि बंगळूरूसह देशीतील सगऴ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे. सोबतच विदेशातून येणाऱ्य़ा प्रत्येक संशयितावर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

छत्तीसगढ़ची राजधानी रायपुरमध्ये या धोकादायक वायरसशी निपटण्यासाठी काय तयारी केली गेली आहे असं झी मीडियाने रायपुरच्या जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारीला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इबोलाच्या संबधित त्यांना कोणताही अलर्ट किंवा सूचना नाही दिली गेली आहे. सोबतच सीएमएचओने हे पण म्हटलं की छत्तीसगढ़च्या वातावरणात इबोला वायरस जगू नाही शकतं. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही.

सीएमएचओ यांच्यानुसार हा वायरस फक्त मेट्रो सिटीतच पसरू शकतो. छत्तीसगढ़च्या आदिवासी भागात राहणारे लोकं याच्या संपर्कात नाही येऊ शकतं. पण जेव्हा इबोलाशी निपटण्यासाठी केलेल्या तयारी बद्दल झी मीडियाने शहरातल्या सगळ्यात मोठ्या बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांना विचारलं तेव्हा त्यांनी सीएमएचओच्या वक्तव्याच्या उलट तयारी ही पूर्णपणे झाली असल्याची माहीती दिली आहे. शिवाय याबद्दल डायरेक्टर हेल्थने सगळ्या विभागांना नोटिस पाठवल्या असल्याचं ही म्हटलं आहे.  

या दोनही अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यानंतर वैद्यकीय आणि आरोग्य विभाग इबोला वासरस बाबत किती गंभीर आहे हे लक्षात येतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.