अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८ तरुण एका ८० वर्षांच्या वृद्धावर तुटून पडलेत. हॉकी, काठीने बेदम मारहाण केली. या वृद्धाला घरातून फरफटत ओढत बाहेर आणून काठीने मारहाण करीत राहिले. यावेळी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. रात्री १.३० वाजता ही घटना घडली. यावेळी अनेक जण रस्त्यावर वावरत होते. तरीही कोणीही मदतीला आले नाहीत.
दरम्यान, ही घटना घडली त्या घटनेपासून केवळ १०० मीटर जवळ पोलीस चौकी आहे. मात्र, पोलिसांना याची काहीही माहीती नाही. पोलीसही घटनास्थळी पोहोचले नाही. ८ जणांच्या टोळक्यांने मारहाण केल्यानंतर तेथे पडून राहिलेल्या वृद्धाला काहींनी हॉस्पीटला नेले. मात्र, आठ दिवसानंतर या वृद्धाचे निधन झाले.
या वृद्धाचा काय होता गुन्हा?
वृद्धाला मारहाण करणारे हे सर्व गुंड लोक होते. ८० अब्दुल कादीर यांचे पान टपरीचे दुकान आहे. दुकानातील वस्तू घेतल्यानंतर त्यांनी गुंडांकडून पैसे मागितले. आणि त्यापुढील घटना घडली.
पाहा हा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.