'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासा

जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या अफेयर समोर आल्यानंतर जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी मुलांच्या मनात विष...

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2024, 03:51 PM IST
'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासा title=
She poisoned children minds Wife Shabana Azmi revealed about Javed Akhtar first wife honey irani

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचं व्यक्तिगत आयुष्य कायम चर्चेत राहिलय. विवाहित आणि दोन मुलांचं वडील असून त्यांनी त्या काळात एक धाडसी निर्णय घेतला होता. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमीसोबत (Shabana Azmi) 1984 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यांची पहिली पत्नी ही देखील अभिनेत्री असून तिचं नाव हननी इराणी (honey irani) होतं. त्यांना फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मुलगी झोया असं दोन मुलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर हनी इराणीला मोठा धक्का बसला होता. (entertainment news in marathi)

तिने मुलांच्या मनात विष...;  

शबाना आझमी यांनी नुकताच एका मुलाखतीत हनी इराणीबद्दल काही खुलासे केले आहेत. शबाना म्हणाल्यात की, 'जावेद अख्तरने विश्वासघात करुनही हनी इराणी यांनी सर्व राग विसरुन त्या पुढे गेल्यात. एवढंच नाही तर वडील किंवा माझ्याबद्दल मुलांच्या मनात कधीही विष कालवलं नाही.'

अरबाज खानच्या ‘द इन्विन्सिबल्स सीरिज’ या चॅट शोमध्ये त्यांनी आयुष्यातील अनेक घटनांबद्दल सांगितलं. या मुलाखती शबाना आझमी यांनी हनी इराणीसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. 'जेव्हा जावेद अख्तरसोबत शबाना यांचं अफेअर सुरू झालं तेव्हा तिच्या मनात खूप कटुता होती. पण हनी इराणी यांनी परिपक्वता दाखवली आणि शबाना किंवा जावेद यांच्याविरोधात मुलांच्या मनात विष कालवलं नाही.'

त्या पुढे असंही म्हणाल्यात की, पती जावेद अख्तर यांनी हनी इराणीसोबतच नातं पुन्हा एकदा निर्माण केलं. मला खूप आनंद वाटतो कारण झोया आणि फरहानसोबत माझं खूप सुंदर नातं आहे. त्यासाठी मी हनीची ऋणी आहे. त्यावेळी तो खरोखरच लहान मुलगा होता. त्यामुळे हनीसाठी जावेदपासून त्याला दूर नेणं ही जगातील सर्वात सोपी गोष्ट होती. पण तिने असं केलं नाही. तर तिने मुलांना आमच्यासोबत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 

हनी इराणीसोबतच नातं...

त्या म्हणाल्या की 'लग्नानंतर हनी इराणीसोबत त्यांनी एक अंतर राखलं होतं. त्यांनी नात्यात जबरदस्ती केली नाही. मी हनीला खरोखर सलाम करते. कारण तिच्या स्वभावामुळे आज हनीसोबतही आमचं खूप चांगलं संबंध आहे. मला माहितीय की, हनीला एवढा विश्वास आहे की, तिला काही हवं असेल तर ती जावेदला मध्यरात्री कॉल करु शकते आणि त्यानंतर तो मदतीला धावून येईल. या नात्यात कुठलंही कटुता नको, असं आम्ही ठरवलं होतं. खरं तर सुरुवातीला ती खूप कडवट होती. मला वाटलं होतं तिने मला नाकारलं. पण आज हे नातं खूप छान आहे. त्याचा मला अभिमान आहे.'