Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, 'ते विश्वाचे निर्माते, त्यांचा...'

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही भक्त मात्र अद्यापही सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाची (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांची काहीच चूक नसल्याचं ते म्हणत आहेत. अशाच एका भक्ताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2024, 05:19 PM IST
Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, 'ते विश्वाचे निर्माते, त्यांचा...' title=

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही भक्त मात्र अद्यापही सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाची (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांची काहीच चूक नसल्याचं ते म्हणत आहेत. अशाच एका भक्ताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये तो या दुर्देवी घटनेसाठी भोलेबाबा जबाबदार नसल्याचा दावा करत आहे. तो म्हणतोय की, "जगात जे काही घडत आहे त्यामागे बाबाच आहेत, पण या दुर्घटनेत त्यांची काहीच चूक नाही".

"श्री नारायण हरी बाबा नाहीत, तर विश्वाचे निर्माता आहेत. जगात जे काही घडत आहे त्याच्या मागे तेच आहेत. पण चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत नारायण हरी यांची काहीच चूक नाही," असं भोले बाबाच्या भक्तांपैकी एक असणाऱ्या विक्रम सिंगने सांगितलं आहे.

हाथरस दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना

दुसरीकडे योगी सरकारने याप्रकरणी कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. या अपघाताची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितले होतं. केंद्र आणि राज्य सरकारनेही यासंदर्भात आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातात बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आम्ही राज्य सरकारकडून उत्तर प्रदेश मुख्यमंत्री बाल सेवा योजनेंतर्गत करू असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. हाथरस दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रजेश श्रीवास्तव, माजी आयएएस हेमंत राव आणि माजी आयपीएस भावेश कुमार सिंह यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टात याचिका

सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान भोले बाबाने न्यायालयीन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी एपी सिंग यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. एपी सिंग यांनी याआधी निर्भया प्रकरणातील आरोपी आणि सीमा हैदरचा खटला लढला आहे  

कोण आहेत एपी सिंग?

निर्भया प्रकरणातील आरोपी आणि सीमा हैदर यांचा खटला लढणारे अजय प्रकाश सिंग म्हणजेच एपी सिंग 2012 मध्ये प्रकाशझोतात आले होते. मात्र, या केसमध्ये त्यांना यश मिळालं नव्हतं. तो खटला ते हरले पण त्याच्या युक्तिवादामुळे शिक्षा बराच काळ टळली होती. अखेर निर्भयाच्या दोषींना फाशी झाली. सीमा कुशवाह या निर्भयाच्या वतीने खटला लढत होत्या. या घटनेने देश आणि जगाला धक्का बसला.

एपी सिंह यांनी हाथरस गँगरेपच्या आरोपींची केसही लढवली होती. एका दलित मुलीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर तरुणीचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी वकील एपी सिंह यांनी पीडितेची हत्या तिच्याच भावाने केल्याचं सांगितले होतं. या प्रकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

एपी सिंह पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरचा खटलाही लढत आहेत. सचिन मीणासोबत PUBG वरून झालेली मैत्री आणि नंतर प्रेमात पडल्यामुळे सीमा नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. सीमाचं आधीच लग्न झालं होतं. तिला चार मुलंही आहेत. सीमा सध्या सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. तिचा पाकिस्तानातील पतीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत होता. सीमाने 2016 मध्ये पाकिस्तानच्या गुलाम हैदरसोबत लग्न केलं होतं. अलीकडेच गुलाम हैदर यांनी सीमाला परत पाठवण्याची विनंती भारत सरकारला केली होती.