'तुला नपुंसक करुन टाकेन,' जेव्हा शाहरुख खानने पत्रकाराला दिली होती धमकी; पण नेमकं झालं काय होतं?

झालं असं की, एका सिने ब्लिट्झ मासिकात असं लिहून आलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितली. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल होईल अन् सीन्सची तीव्रता वाढलं. शाहरुख खानने हे वाचलं अन् मग...  

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2024, 04:32 PM IST
'तुला नपुंसक करुन टाकेन,' जेव्हा शाहरुख खानने पत्रकाराला दिली होती धमकी; पण नेमकं झालं काय होतं? title=
When Shah Rukh Khan threatened a journalist to make you impotent maya memsaab bold scene caused

किंग खान (King Khan) आज बॉलिवूडमधील सर्वात नावाजलेला आणि पत्रकारांसोबत प्रेमळ वर्तनासाठी ओळखला जातो. पण फार कमी लोकांना माहितीय की, एकदा शाहरुख खानने एका पत्रकाराला (journalist) धमकी देत शिवीगाळ केली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या प्रकरणात शाहरुख खानला (shah rukh khan) जेलची हवा देखील खावी लागली होती. नेमकं काय घडलं होतं, काय आहे हा किस्सा (Bollywood Kisse) जाणून घेऊयात. 

'तुला नपुंसक करुन टाकने'

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता विधू विनोद चोप्रा यांची पत्नी प्रसिद्ध पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या 'किंग ऑफ बॉलिवूड' या पुस्तकात या किस्साचा उल्लेख केलाय. शाहरुख खान एका पत्रकारावर खूप धमकावलं होतं आणि एवढंच नाही तर त्या पत्रकाराच्या घरी जाऊन आई वडिलांसमोर धमकी दिली होती. 

ही घटना 31 वर्षांपूर्वी 'माया मेमसाब' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. 2 जुलै 1993 ला प्रदर्शित झालेल्या 'माया मेमसाब' या चित्रपटात शाहरुख खानसोबतद दीपा साही झळकली होती. दीपा साही या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांच्या पत्नी होत्या. 1992 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. 'माया मेमसाहब' मध्ये शाहरुख खान आणि दीपा साहीचा एक अतिशय बोल्ड सीन होता. दोन्ही स्टार्स जवळपास न्यूड अवस्थेत या सीनमध्ये दाखवण्यात आले होते. शाहरुख खान आणि दीपा साही या दोघांनाही सीनबद्दल खूप संकोच होता. काही केला हवं तसं हा सीन होत नव्हता.

या सीनची भनक पत्रकाराला लागली. सिने ब्लिट्झ मासिकात या सीनबद्दल लिहिताना असं म्हटलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितलं. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल आणि सीन्सची तीव्रता वाढेल. एवढंच नाही पुढे या लेखात असंही म्हटलं गेलं की, दोघांनीही मेहता यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये एक खोली बुक करण्यात आली. दोघेही सोबत राहिले आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग झाले. शूटिंगदरम्यान रूममध्ये फक्त केतन मेहता आणि सिनेमॅटोग्राफर होते, बाकी कोणीही नव्हतं. सिने ब्लिट्झने पत्रकाराचं नाव न घेता ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. हा लेख शाहरुख खानच्या हाती लागला आणि तो कोणी लिहिला आहे ते समजू शकलं नाही. शाहरुख खानचे मन अस्वस्थ झालं होतं. 

हा लेख प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी शाहरुख खानने सिने ब्लिट्ज मॅगझिनचे पत्रकार कीथ डीकॉस्टा यांना पाहिलं. मग काय शाहरुखचा पारा गगनाला भिडला. शाहरुखला वाटलं की, कीथ डीकॉस्टाने ही बातमी आपल्याबद्दल लिहिलीय. कीथ बीच इव्हेंटमधून घरी आल्यानंतर त्याच कार्यक्रमात किंग खानने कीथला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर शाहरुख खाननेही त्याला फोन करून धमकावले आणि घरी येऊन मारहाण करीन, अशी धमकी दिली. कीथला वाटले की शाहरुख खान त्याला धमकावत आहे पण तो घरी येणार नाही. पण झालं उलटच शाहरुख खान कीथचा घरी पोहोचला आणि आई-वडिलांसमोर कास्ट्रेट करण्याची धमकी दिली.

कीथ घाबरला आणि त्याने शाहरुख खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. शाहरुख खान पोलीस तक्रारीनंतरही घाबरला नाही. तो कीथनेला धमकी देत होता. शेवटी घाबरलेल्या कीथने पोलिसांकडे संरक्षण मागितले. शाहरुख खानविरोधात दुसरी तक्रार आल्यामुळे त्यांना शाहरुखला अटक करावी लागली. पोलिसांनी शाहरुख खानला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं. शाहरुख त्यावेळी चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवले नाही तर पोलीस ठाण्यात ठेवलं. पुस्तकानुसार पोलिसांनी शाहरुख खानचे ऑटोग्राफही घेतलं. शाहरुखने पोलिसांकडे फोन कॉल करण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी ही परवानगी दिल्यावर त्याच्या घरी फोन करण्याऐवजी त्याने कीथला पोलीस स्टेशनमधून फोन केला. शाहरुखने कीथला सांगितले की, "मी तुरुंगात आहे, पण मी तुला सोडणार नाही." शाहरुखने फोनवर शिवीगाळही केली आणि तीही पोलिसांसमोर. रात्री 11.30 वाजता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे याने शाहरुख खानची जामिनावर सुटका केली. 

शाहरुख खानने 2 वर्षांनंतर...

दोन वर्षांनंतर शाहरुख खानने सिने ब्लिट्झची पत्रकार व्हर्जिनिया यांची भेट घेतली. त्याने शाहरुख खानला सांगितलं की, ती कथा कीथ डीकॉस्टा यांनी लिहिलेली नाही. व्हर्जिनियाचे म्हणणे ऐकल्यानंतर शाहरुख खानला आपली चूक लक्षात आली आणि त्याने कीथ डीकोस्टा यांना फोन करुन कीथचीच नाही तर त्याच्या पालकांचीही माफी मागितली. इतकंच नाही तर या माफीनंतर शाहरुख खानने कीथ डिकॉस्टा यांना अनेक मुलाखतीही दिल्या आहेत.