सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'

केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.

Updated: Sep 9, 2015, 02:47 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट' title=

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.

या वाढीमुळे एक करोडहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा फायदा मिळणार आहे. 

केंद्रीय कॅबिनेटनं महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ केलीय. यंदा एप्रिल महिन्यात सरकारनं डीए 6 टक्क्यांनी वाढवून कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 113 टक्के केलं होतं... आणि जानेवारीपासून लागू करण्यात आलं होतं.

हाच महागाई भत्ता आता 119 टक्क्यांवर पोहचलाय. ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार आहे. 

डीएमध्ये वाढ करण्याची शिफारस सहाव्या वेतनात करण्यात आली होती. याचा फायदा 48 लाख सरकारी कर्मचारी आणि 55 लाख पेन्शनधारकांना होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.