नवी दिल्ली : मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मूळची दिल्लीतील मंगोलपूर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीवर २७ जणांनी जयपूरच्या एका हॉटेलात सातत्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून रॉकी आणि त्याच्या पत्नीने जयपूरला आणले होते.
३० ऑगस्टला पिडीत मुलीला जयपूरला नेले. तेथील इंद्रप्रस्थ हॉटेलात तिला सोडून निघून गेले. यानंतर हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांसह एकूण २७ जणांनी पीडितेवर सातत्याने बलात्कार केला. तिला भूकेपोटी ठेवण्यात आले. ती भूक आणि वेदनेने तडफडत होती. या पिडीतीने कशीबशी हॉटेलमधून स्वत:ची सुटक करुन दिल्ली गाठली.
दिल्लीत आल्यानंतर पोलिसात तक्रार केली. ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान २४ तास माझ्यावर बलात्कार करण्यात आला, असे तिने तक्रारीत म्हटलेय. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.