पतंजलि नंतर आता येणार MSG नूडल्स

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलिच्या सर्व उत्पदनांना नागरिकांकडून चांगली पसंती मिळतेय.

Updated: Jan 31, 2016, 03:56 PM IST
पतंजलि नंतर आता येणार MSG नूडल्स title=

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलिच्या सर्व उत्पदनांना नागरिकांकडून चांगली पसंती मिळतेय. रामदेव बाबांनी सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ आणि इतर काही उत्पादने बाजारात आणली आहेत.

रामदेव बाबांच्या या उत्पादनांना टक्कार देण्यासाठी आता डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम इन्सान सज्ज झालेत. पतंजलिने आटा न्यूडल्स बाजारात आणल्यानंतर गुरमीत राम रहीमही इंस्टंट नूडल्स आणण्याच्या तयारीत आहेत. 'एमएसजी' या नावानेच ते आपलं उत्पादन बाजारात आणणार आहेत, अशी माहिती मिळतेय. 

गेल्या काही दिवसांत पतंजली उत्पादनांच्या वाढलेल्या खपामुळे अनेक बड्या कंपन्यांना घाम फुटला होता, अशा बातम्या आल्या होत्या. पतंजलिच्या उत्पादनांचा वाढता खप पाहता राम रहीमसुद्धा या स्पर्धेत उतरतायत. गुरमीत राम रहीम नूडल्स सोबतच फर्निचर आणि इतर काही गृहपयोगी वस्तूही बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.