अहमदाबाद : अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.
कर्म नावाचं हे कॅफे एक वर्षापूर्वी नवजीवन प्रेसने सुरू केलं होतं, नवजीवन प्रेस अनेक वर्षापासून महात्मा गांधींची पुस्तक छापत आहे.
नवजीवन प्रेसमध्ये येणाऱ्या लोकांसाठी वेगळं काही करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला या हॉटेलात जे हवं असेल, ते स्वत: जाऊन घ्यावं लागेल, जेवण झाल्यानंतर ताटंही स्वत: ठेवायला जावं लागेल. येथे मॅनेजर आणि वेटर कुणीही तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला काही पैसे द्यायचे ,तर ते बाहेर ठेवलेल्या डब्यात टाका.
हे हॉटेल सुरू करण्यास एक वर्ष झालं, एक वर्षाचा हिशेब केला, हॉटेल चालवण्याचा खर्च काढून साडेतीन लाख रूपये शिल्लक राहिले.
इथलं शांत वातावरण लोकांना आवडतं, अनेक कॉर्पोरेट कंपन्या आपल्या बैठका आता येथे आयोजित करतात. जेवणाच्या दर्जाबद्दल लोक समाधानी आहेत, गांधी थाळी लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
पहिल्यांदा पैसे न देणाऱ्यांची संख्या मोठी होती, पण आता कुणीही तसं करताना दिसत नाही. आमचं यावर काही लक्ष ,असंही एका व्यवस्थापकाने सांगितलं.
सुरूवातीला लोकांनी या मेनूची किंमत किती आहे , अशी चौकशी सुरू केली, ते प्रमाण वाढत होतं, म्हणून आम्ही किंमत लिहिण्यास सुरूवात केली, पण ती तुम्ही दिलीच पाहिजे असा कोणताही आग्रह नाही. पण लोक देतात, म्हणूनच आम्हाला वर्षभरात साडेतीन लाखाचा फायदा झाला असं एकाने सांगितलं.