पणजी : संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. साठी आल्याने आता आपण राजकीय संन्यास घेणार असल्याचं पर्रिकर यांनी म्हटलं होतं.
आपलं हे वक्तव्य राजकीय सन्यासाशी जोडू नका, मी हे वक्तव्य सहजच केलं होतं, त्याला एवढ्या गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचं पर्रिकर यांनी म्हटलं आहे.
या आधी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले होते, एका कार्यक्रमात बोलतांना पर्रिकर म्हणाले होते की, ६० वर्ष वय झाल्यानंतर लोकांनी रियाटरमेंटच्या बाबतीत विचार केला पाहिजे.
आता १३ डिसेंबर रोजी मी देखील ६० वर्षांचा होणार आहे. हे पाहून मी दोन-तीन वर्षाआधीच तयारी सुरू केली आहे. कोणतीही मोठी जबाबदारी पार पाडण्याची आता माझी इच्छा राहिलेली नसल्याचं पर्रिकर म्हणाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.