'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'

१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही. 

Updated: May 2, 2015, 04:03 PM IST
'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर' title=

नवी दिल्ली: १९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही. हा खळबळजनक खुलासा केलाय सीबीआयचे तत्कालीन डीआयजी आणि दिल्ली पोलीस माजी कमिश्नर नीरज कुमार यांनी. वर्ष अखेरीस येणाऱ्या आपल्या पुस्तकाच्या चॅप्टर 'डायलॉग विथ द डॉन' मध्ये हा खुलासा त्यांनी केलाय. या पुस्तकाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. 

आपल्या ३७ वर्षाच्या करिअरमध्ये १० मोठ्या इन्व्हेस्टिहेशनला पुस्तकाचं स्वरूप देणाऱ्या नीरज कुमार यांचं म्हणणं आहे की, दाऊद इब्राहिम १९९३च्या मुंबई सीरिअल ब्लास्टच्या १५ महिन्यांनंतर सरेंडर करू इच्छित होता. सरेंडर करण्यासंदर्भात त्यानं तत्कालीन सीबीआय डीआयजी नीरज कुमार यांच्याशी बोलणं पण केलं होतं. मात्र काही कारणांनी एजंसींनी याचा स्वीकार केला नाही आणि आजही तो भारताच्या तावडीतून दूर पळालाय. डी-कंपनीच्या नावानं आपला काळा धंदा चालवणाऱ्या दाऊदसोबत नीरज कुमार यांनी तीन वेळा चर्चा केली होती. दाऊद मुंबई ब्लास्टचा मुख्य आरोपी आहे.

नीरज यांच्या मते, 'दाऊदचा विश्वसनीय आणि डी-कंपनीची कायदेशीर बाब पाहणारा मनीष लााल फोन वर बोलत होता. लाला जवळ लॉमध्ये पास झाल्याची कोणतीही डिग्री नव्हती.मात्र तो दाऊदच्या कायदेशीर बाबी पाहायचा. मी मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये लालाला भेटलो होतो.' सीबीआयच्या एका दुसऱ्या प्रकरणात त्याला अटक केली होती आणि तो मुंबईतील जेलमध्ये बंद होता. बसण्यासाठी खूर्ची दिल्यानंतर लाला सीबीआय ऑफिसर नीरज कुमार यांच्यावर विश्वास ठेवू लागला होता. नीरज कुमार १९९३पासून २००२पर्यंत सीबीआयमध्ये होते.

आपल्या पुस्तकाचा संदर्भ देत नीरज कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं की, 'मी जून १९९४मध्ये तीन वेळा दाऊद सोबत बोललो. तो सरेंडर करण्याबाबत विचार करत होता. माज्ञ त्याला एक काळजी होती. त्याला भीती होती की, जेव्हा तो भारतात येईल तेव्हा त्याची विरोधी गँग त्याला मारून टाकेल. मी त्याला सुरक्षेबाबत आश्वासन दिलं होतं आणि म्हटलं होतं त्याची सुरक्षा सीबीआयची जबाबदारी असेल.' मात्र यानंतर त्यांच्या सीनिअर अधिकाऱ्यांनी फोन वर बोलणं बंद करवलं. 

नीरज कुमार यांनी सांगितलं, दाऊद यानंतरही बोलू इच्छित होता. पण मला सीनिअर्सकडून त्याबाबत परवानगी मिळाली नाही. म्हणून मी पुढे बोललो नाही. जुलै २०१३मध्ये दिल्ली पोलीस कमिश्नरच्या पदावरून रिटायर्ड झाल्यानंतर नीरज कुमार मुंबईमध्ये १२ मार्च १९९३च्या १३ बॉम्बस्फोटाच्या सीबीआय तपासाचं नेतृत्व करत होते. मुंबईतील या स्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७०० जण जखमी झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.