पाकिस्तानसाठी चीनी लष्कर तैनात करणार

पाकिस्तानमध्‍ये चीनचे लष्‍कर लवकरच तैनात होणार आहे. सुरक्षा एजन्सींनी याची माहिती सरकारला दिली आहे. 

Updated: Mar 13, 2016, 09:01 PM IST
पाकिस्तानसाठी चीनी लष्कर तैनात करणार title=

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्‍ये चीनचे लष्‍कर लवकरच तैनात होणार आहे. सुरक्षा एजन्सींनी याची माहिती सरकारला दिली आहे. 

हे चिनी लष्‍कर ३ हजार किमी लांब चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या सुरक्षेची व्यवस्था पाहणार आहे. बलुचिस्तानच्या ग्वादर बंदर ते शिनजियांगला कॉरिडोरला ही बॉर्डर जोडते.

पाकिस्तानचे ग्वादर बंदर ते चीनचे शिनजियांग भाग हा कॉरिडॉर जोडतो. 
पाकिस्तानने ३ स्वतंत्र इन्फन्ट्री ब्रिगेड आणि २ रेजिमेंट्स महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी तैनात आहेत 
एका ब्रिगेडमध्‍ये कमीत कमी ३ रेजिमेंट असतात. प्रत्येक रेजिमेंटमध्‍ये १ हजार जवान असतात.

हालचालीवर नजर

महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए) काराकोरमध्ये तैनात करण्‍यात येणार
चिनी लष्‍कर पाकिस्तानात असणे ही चिंतेची बाब
भारताने गिलगिट-बाल्टिस्तान भागात या पूर्वी चिनी लष्‍कराच्या उपस्थितीवर हरकत नोंदवली होती. 
आम्ही हालचालींवर बारकाईने नजर ठेवत आहोत. आम्हाला माहिती आहे, की चिनी लष्‍कराची संख्‍या पाकिस्तानमध्‍ये किती असेल- एका अधिकाऱ्याची माहिती