‘परिक्रमा’बंदीचा विरोध, विहिंपचं धरणं आंदोलन

विश्व हिंदू परिषदेची ८४ कोसी परिक्रमा यात्रा ८४ पाऊलं सुद्धा पुढं गेली नाही. यात्रा फ्लॉप झाली असली तरी यानिमित्तानं चर्चेत राहण्याचा विहिंपचा प्लान हिट झाला. उत्तरप्रदेश सरकार देशाची दिशाभूल करत असून, हे सर्व आझम खान यांच्या सांगण्यावरुन अखिलेश सरकार करतंय, असा आरोप अशोक सिंघल यांनी केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 26, 2013, 11:58 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
विश्व हिंदू परिषदेची ८४ कोसी परिक्रमा यात्रा ८४ पाऊलं सुद्धा पुढं गेली नाही. यात्रा फ्लॉप झाली असली तरी यानिमित्तानं चर्चेत राहण्याचा विहिंपचा प्लान हिट झाला. उत्तरप्रदेश सरकार देशाची दिशाभूल करत असून, हे सर्व आझम खान यांच्या सांगण्यावरुन अखिलेश सरकार करतंय, असा आरोप अशोक सिंघल यांनी केलाय.
विश्व हिंदू परिषदेच्या परिक्रमा यात्रेला उत्तर प्रदेश सरकारनं रेड सिग्नल दिला होता. मात्र याला झुगारत विश्व हिंदू परिषदनं यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश सरकारनंही कारवाईचा बडगा उगारत प्रवीण तोगडिया आणि अशोक सिंघल यांना अटक केली. याशिवाय इतर नेत्यांसह जवळपास २०९६ कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेश सरकारनं अटक केलीय.
त्यामुळं शरयू तटावर सांकेतिक पूजा संपन्न झाल्याचा दावा विहिंप नेत्यांनी केलाय. आजपासून देशभरात विहिंपनं मोठ्या आंदोलनाची घोषणा केलीय. जंतरमंतरपासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.