ब्रिक्स परिषदेत मोदी जॅकेटची क्रेझ

गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी.

Updated: Oct 16, 2016, 08:29 AM IST
ब्रिक्स परिषदेत मोदी जॅकेटची क्रेझ title=

पणजी : गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी.

यावेळी सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या त्या या नेत्यांच्या ड्रेसिंग स्टाईलनं. ब्रिक्स देशाचे प्रमुख या रात्रीच्या जेवणासाठी चक्क मोदी जॅकेटमध्ये अवतरले.

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा हे भारतीय मोदी जॅकेट परिधान करुन अवतरले. त्यामुळं जगभरातल्या बिग बॉसवर मोदी जॅकेटची जादू झाल्याचं पाहायला मिळतंय.