दारु पिऊन नवरा आला, वधूने माघारी धाडली वरात

लग्नसोहळ्यादरम्यान दारु पिऊन मंडपात येणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले. कानपुरच्या सिंघौल गावात एक दारुड्या वराची वरात पोहोचली. मात्र जेव्हा वधूला समजले की वर दारु प्यायला आहे तर तिने लग्न करण्यासच नकार दिला. त्यामुळे वरातीला बिनावधू माघारी परतावे लागले. 

Updated: Dec 17, 2015, 12:17 PM IST
दारु पिऊन नवरा आला, वधूने माघारी धाडली वरात title=

कानपूर : लग्नसोहळ्यादरम्यान दारु पिऊन मंडपात येणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले. कानपुरच्या सिंघौल गावात एक दारुड्या वराची वरात पोहोचली. मात्र जेव्हा वधूला समजले की वर दारु प्यायला आहे तर तिने लग्न करण्यासच नकार दिला. त्यामुळे वरातीला बिनावधू माघारी परतावे लागले. 

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, वरात मुलीच्या घराच्या दारापर्यंत पोहोचली. वरातीचे स्वागतही करण्यात आले. रितीरिवाजानुसार पुजाही करण्यात आला. त्यानंतर नवरामुलगा वरमाला घेऊन स्टेजवर पोहोचला आणि त्याला स्वत:ला सावरताही येत नव्हते. 

हे पाहिल्यानंतर नवऱ्यामुलाने दारु प्यायली असल्याचे वधूच्या लक्षात आले आणि तिने लगेच लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर मोठा हंगामा झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. नवऱ्यामुलाच्या घरच्यांनी मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.

अखेर दोन्ही कुटुंबातील लोकांनी चर्चा केली. मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यानं नवऱ्यामुलासह वरातीला रिकाम्या हाती माघारी परतावं लागलं.