चेन्नई : शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे. दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे.
असा वाचला विकास
शनिवारी चेन्नईच्या पोरूर भागात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४६ जणांनी आपले प्राण गमावले. दुर्घटनेच्या चार दिवसानंतर ढिगारा काढण्याचे काम सुरू असताना तब्बल ७२ तासांनंतर विकासला बाहेर काढण्यात यश आले. अशा प्रकारे विकास ढिगाऱ्यातून बाहेर येणे चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
सोमवारी ९ वाजता एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमच्या श्वान पथकातील रुस्तम नावाच्या कुत्याने विकासला शोधून काढले. रुस्तमने एका ठिकाणी भूंकून सांगितले की, ढिगाऱ्याखाली कोणीतरी आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने रुस्तमच्या सांगण्यावरून ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले.
सकाळी साडे अकरा वाजता एका माणसाचा आवाज ऐकू आला. त्याच्याशी बोलणे सुरू केले आणि ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. दुपारी १.३० वाजता ट्यूबच्या साह्याने त्याला ग्लुकोज देण्यात आले. दोन तासांनंतर विकासने रेस्क्यू टीमच्या एका सदस्याशी हस्तांदोलन केले.
सायंकाळी ५ वाजता त्याला काढण्यात यश आले. बाहेर येताच त्याने विचारले माझी चप्पल कुठे आहे. त्याच्या या प्रश्नावर एनडीआरएफची टीमला आश्चर्य वाटले. एनडीआरएफच्या कमांडंट एम. के. वर्माने त्याला नवीन चप्पल घेऊन दिली.
त्यानंतर विकासला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
मूळचा ओडिशाचा राहणारा विकास इमारत कोसळली तेव्हा दुसऱ्या मजल्यावर होता. जेव्हा तो बाहेर आला त्यावेळी आसपासची परिस्थिती पाहून आपण मोठ्या दुर्घटनेतून वाचलो आहे हे समजण्यास थोडा वेळ लागला .
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.