व्हिडिओ : सरकारच्या नाकावर टिच्चून ५ वर्षांच्या चिमुरडीचा विवाह!

'स्त्री भ्रूण हत्या करू नका' असं कितीही ओरडून सांगितलं... बेटी बचाओ, बेटी पढाओचे कितीही नारे लगावले... तरी या समाजाची बदलायची तयारीच नाही... राजस्थानातल्या चित्तौढगडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं... ज्या चिमुकलीला धड चालताही येत नाही, त्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं सात फेरे घेतले... हृदय पिळवटून  टाकणारं हे दृश्य होतं....

Updated: Apr 22, 2016, 01:54 PM IST
व्हिडिओ : सरकारच्या नाकावर टिच्चून ५ वर्षांच्या चिमुरडीचा विवाह! title=

जयपूर : 'स्त्री भ्रूण हत्या करू नका' असं कितीही ओरडून सांगितलं... बेटी बचाओ, बेटी पढाओचे कितीही नारे लगावले... तरी या समाजाची बदलायची तयारीच नाही... राजस्थानातल्या चित्तौढगडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं... ज्या चिमुकलीला धड चालताही येत नाही, त्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं सात फेरे घेतले... हृदय पिळवटून  टाकणारं हे दृश्य होतं....

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/n_7RiNpBRTU?rel=0" frameborder="0" allowfullscreen></iframe>

काश मै तेरी बेटी न होती... 

दृश्यांमध्ये दिसतंय ते आहे भयानक वास्तव.... नवरदेवाबरोबर अग्निकुंडाभोवती सात फेऱ्या मारणारी ही अवघ्या पाच वर्षांची चिमुरडी... १७ एप्रिल २०१६चं हे दृश्य... राजस्थानमधल्या चितोडचं...  बेटी बचाओ, बेटी बढाओचे नारे देशात दिले जात असताना त्याच्या नाकावर टिच्चून बालविवाह करणारे हे भयाण राक्षस...

काश मै तेरी बेटी न होती... असं कुठल्याही मुलीनं तिच्या आई वडिलांना म्हणणं, याशिवाय मोठं दुर्दैव नाही... पण खेळत्या बागडत्या वयात तिला लग्नाच्या बंधनात जखडून टाकणारे नालायक लोक या देशात आजही आहेत... आणि त्याच मूर्ख आणि निर्बुद्ध आई वडिलांच्या पोटी मुलं जन्माला न आलेलीच बरी...