मुंबई : तुम्हीही दिवसातून एखादी डुलकी घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
साधारणपणे कामादरम्यान डुलकी लागल्यास हे आळशीपणाचे लक्षण मानले जाते. मात्र हे आळसपणाचे लक्षण नव्हे तर चांगल्या आरोग्याची निशाणी आहे.
आरोग्यासंबंधित एका रिपोर्टनुसार, दिवसातून लहानशी झोप घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वैज्ञानिकांच्या मते, डुलकीमुळे आपण अधिक सतर्क होतो तसेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
रिपोर्टनुसार, एक तृतीयांश अमेरिकन लोक दिवसातून एखादी डुलकी घेतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतोय. त्यामुळे कामाच्या ठिकाणी दमला असाल तर दिवसातून एखादी डुलकी घेण्यास हरकत नाही. तसेच डुलकी घेण्याआधी चहा अथवा कॉफीचे सेवन करणेही चांगले.