मुंबई : मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी... या आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
अनेक मधुमेह, कॅन्सर आणि उच्च रक्तदाबाचे रुग्णं दर महिन्याला औषधांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळालाय.
दरम्यान, ग्लूकोज आणि सोडियम क्लोराइड इंजेक्शनच्या छोट्या पॅकची किंमत वाढवण्यात आलीय. तर मोठ्या डोसच्या पॅकच्या किंमतीत कपात केली गेलीय.
एबॉट हेल्थकेयर, सिप्ला, ल्यूपिन, एलेम्बिक, एलकेम लैबोरेटरीज, नोवार्टिस, बायोकॉन, इंटास फार्मास्युटिकल्स आणि सन फार्मास्युटिकल्स या कंपन्यांच्या औषधांना नव्या किंमती लागू होणार आहेत.
आजच्या काळात आहारापेक्षाही औषध महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे आगामी काळात दर कपात केलेल्या ५६ औषधांचा आकडा आणखी वाढणं गरजेचं आहे.