सकाळी उठून चुकूनही ही कामे करु नका

रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय नेहमी चांगली. 

Updated: Feb 18, 2016, 05:31 PM IST
सकाळी उठून चुकूनही ही कामे करु नका title=

मुंबई : रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय नेहमी चांगली. अनेक जण सकाळी उठल्यावर कोमट पाणी घेतात, अनेक मेडिटेशन करतात, काहीजण व्यायाम तर अनेकांचा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम असतो. या सवयींमुळे आपले आरोग्य चांगले राहते. मात्र काहींना अशा काही सवयी असतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

 

सकाळ प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्नता कायम राहते. त्यामुळे सकाळी उठून अशी कोणतीही कामे करु नका ज्यामुळे तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल. याचा शरीरारवरही मोठा परिणाम होतो. 

उठल्यानंतरही इथे तिथे पडून राहणे

- अनेकांना सकाळी जाग आल्यानंतक बेड होवर अथवा इथे तिथे पडून राहण्याची सवय असते. यामुळे शरीरात अधिक आळस निर्माण होतो.  

भांडण करु नका

- सकाळचे वातावरण नेहमी प्रसन्नता वाढवणारे असले पाहिजे. त्यामुळे उठल्यानंतर कोणाशी वाद घालू नका. यामुळे दिवसभर तुमचा मू़ड खराब राहील. 

मसालेदार खाणे

- सकाळच्या वेळेस नाश्ता घेताना अधिक मसालेदार खाणे टाळा. हलका आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे. 

कॉफी पिणे

- अनेकांना सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याची सवय असते. मात्र तज्ञांनुसार सकाळी कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोल या हार्मोनचे प्रमाण वाढते.

 

स्मोकिंग करणे

- स्मोकिंग कोणत्याही वेळेस करणे शरीरासाठी हानिकारकच. मात्र सकाळी उठल्यानंतर सिगारेट पिणे आरोग्याचा अधिक नुकसानकारक ठरु शकते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक बळावते. 

ड्रिंक करणे

- काही जणांना सकाळी उठल्यानंतरही दारु पिण्याची सवय असते. मात्र या सवयीमुळे तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात घालताय.