पाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास हे करा

 हल्लीच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पाठदुखीचे प्रमाण सर्रास वाढले आहे. सतत कम्प्युटर्ससमोर बसून काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. मात्र याकडे दुर्लक्ष करु नका. कारण ही समस्या पुढे मोठे रुप धारण करु शकते. याआहेत काही फिजीकल थेरपी ज्याने तुम्ही हा त्रास कमी करु शकता.

Updated: Dec 9, 2015, 12:20 PM IST
पाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास हे करा title=

नवी दिल्ली :  हल्लीच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पाठदुखीचे प्रमाण सर्रास वाढले आहे. सतत कम्प्युटर्ससमोर बसून काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. मात्र याकडे दुर्लक्ष करु नका. कारण ही समस्या पुढे मोठे रुप धारण करु शकते. याआहेत काही फिजीकल थेरपी ज्याने तुम्ही हा त्रास कमी करु शकता.

-पाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास बसणे, चालणे कठीण होऊन जाते. त्रास जाणवल्यास लगेचच चालू अथवा बसू नका.

-पोटावर झोपा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि डोके एका बाजूला करुन दीर्घ श्वास घ्या.  

-त्यानंतर सूर्यनमस्काराचे आसन घ्या. हळूहळू श्वास घ्या आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा.

-त्यानंतरही पाठदुखीचा त्रास जाणवत असेल तर पुन्हा काही वेळा पोटावर झोपा आणि रिलॅक्स व्हा. पुन्हा सूर्यनमस्काराचे आसन घ्या. ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करा. यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.