10 वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेऊ नका

आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. आज आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण तरीही कधी कधी काही वस्तू ह्या गळून जातात. असं का होतं. आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे.

Updated: Dec 8, 2015, 08:16 PM IST
10 वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेऊ नका title=

मुंबई : आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. आज आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण तरीही कधी कधी काही वस्तू ह्या गळून जातात. असं का होतं. आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे.

१. टोमॅटो : आपल्या पैकी अनेक जण हे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवतात. टोमॅटो हे उन्हामुळे वाढणार फळ आहे. टोमॅटोला पाणी आणि सामान्य तापमानाची गरज असते. त्यामुळे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास गळून जातो.

२. केळी : केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर काळी पडते. केळीच्या देठातून इथाईलीन नावाचा गॅस बाहेर पडत असतो. जो फ्रिजमधील इतर गोष्टीही खराब करू शकतो.

३. सफरचंद : हे फळ फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास कागदात गुंडाळून भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या खालच्या भागातच ठेवावे. बिया असणारे फळही फ्रिजमध्ये ठेऊ नये. कमी तापमनामुळे हे फळ लवकर पिकतं आणि खराब होऊ शकतं.

४. लिंबू : लिंबू आणि संत्री हे  फळही सिट्रीक अॅसिडमुळे जास्त काळ थंड्या ठिकाणी चांगलं राहू शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवल्याने यांच्यातील रस निघून जातोय

५. काकडी : उन्हाळ्यात आपण काकडी खाणं अधिक पंसत करतो. पण 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त दिवस काकडीही फ्रिजमध्ये टिकू शकत नाही. काकडी टोमॅटो आणि केळीपासून दुर ठेवावी. 

६. टरबुज : कापल्यानंतर टरबुज आणि खरबुज फ्रिजमध्ये नका ठेऊ. या फळामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्साईड असतं. ज्यामुळे ह्या वस्तू खराब होतात. 

७. बटाटा : बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्यातील स्टार्च हा साखरेमध्ये रूपांतरित होतो. बटाटे उन्हापासूनही लांब ठेवायला हवेत. घरातील कोणत्याही थंड ठिकाणी ठेवायला हवेत.

८. कांदा : कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील ओल्याव्यामुळे ते लवकर खराब होतात. कांदा बटाटा कधीही एकत्र ठेऊ नये. बटाट्यामधील गॅस हा कांदा खराब करतो.

९. लसून : लसूनही कांद्याप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर गळून जातो. कांदा आणि लसून हा कोणत्याही अंधार असलेल्या जागी ठेवावा. 

१०. ब्रेड : ब्रेड हा 2 -3 दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे. पण पिज्जा, ब्रेड, बर्गर या वस्तू फ्रिजरमध्ये ठेवाव्या. पण त्या पूर्णपणे प्लास्टीकच्या कागदात गुंडाळून ठेवाव्यात. खाण्यापूर्वी त्याला काही वेळ आधी फ्रिजमधून काढून ठेवावा.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.