महाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांनीकडे फक्त 5 खुनांची नोंद

Beed  News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 8, 2025, 07:29 PM IST
महाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांनीकडे फक्त 5 खुनांची नोंद   title=

Beed Crime News : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह  सापडले आहेत. 109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली आहे. पोलिसांनीकडे फक्त 5 खुनांची नोंद आहे. परळीत दर तीन दिवसांनी एक मृतदेह सापडतो.  परळीत वर्षभरात एवढे मृतदेह सापडतातच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

गेल्या वर्षभरात परळी तालुक्यात तब्बल 109 मृतदेह पोलिसांना आढळून आलेत. या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे.  यात काहींचे आत्महत्या काहींचे बेवारस मृतदेह, तर काहींचे अपघातात मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे. हा इतका मोठा आकडा भुवया उंचावणारा आहे. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झालेत. त्यामुळं हा आलेला आकडा पोलीस तपासाचा भाग आहे. मात्र फक्त परळी तालुक्यात इतके मृतदेह आढळून येणं धक्कादायक आहे. 

परळी तालुक्यत गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे, यात आत्महत्या केलेले, बेवारस मृतदेह आढळलेले,अपघातात मृत्यू झालेले  मृतदेह असतात मात्र एक तालुक्यत इतका मोठा आकडा भुवया उंचावणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झाले आहेत. त्यामुळं  हा आलेला आकडा हा पोलीस तपासाचा भाग आहे मात्र फक्त परळी तालुक्यत इतके मृतदेह आढळून येणे धक्कादायक आहे.

मागील वर्षभरात  परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाही. तर,  परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले त्यातील 21 मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर 4 मृत देहाची ओळख पटली नाही,  तीनही पोलीस स्टेशनच्या  हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दर 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येताय..