Tigers Poached:वाघांच्या नंदनवनातच वाघ का आलेयत धोक्यात?

Bhandara Tiger: वाघांचं नंदनवन असलेल्या विदर्भात वाघ असुरक्षित झालाय. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 8, 2025, 09:23 PM IST
Tigers Poached:वाघांच्या नंदनवनातच वाघ का आलेयत धोक्यात? title=
वाघ

Bhandara Tiger: नव वर्षाच्या सुरुवातीलाच विदर्भात वाघांची शिकार करण्यात आल्याचं समोर आलंय. 15 दिवसात 2 वाघांची शिकार झाल्यानं वन विभागाची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे वाघांचे अनेक तुकडे करण्यात आलं. काय आहे भंडारा जिल्ह्यातील वाघाच्या शिकारीचं वास्तव जाणून घ्या. 

वाघांचं नंदनवन असलेल्या विदर्भात वाघ असुरक्षित झालाय. विदर्भातल्या भंडाऱ्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन वाघांची हत्या झालीये. धक्कादायक बाब म्हणजे वाघाची शिकार केल्यानंतर त्याचे चार तुकडे करण्यात आले. ज्या वाघाचे तुकडे करण्यात आलेत. त्याची पहिल्यांदा शॉक लावून शिकार करण्यात आली. त्यानंतर वाघाच्या मृतदेहाचे चार तुकडे करुन ते फेकण्यात आले होते. 

नववर्षाच्या सुरुवातीच्या 15 दिवसातच विदर्भात  दोन वाघांची शिकार करण्यात आली.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी इथळ्या कोळसा खाणीत वाघ मृतआवस्थेत आढळला. वाघाच्या पंजाची नखे आणि जबड्यातील दोन मुख्य दात गायब होते.

वाघाचे तुकडे केल्याप्रकरणी वन विभागानं तिघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केलीय. तसेच वाघाची शिकार करून त्याचे अवयव आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय आता वन विभागाला आहे.. या टोळीचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत.