मुंबई : हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनीज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
अधिक वाचा : आरोग्य विषयक बातम्या
चण्याबरोबर काळे चणेही अधिक उपयुक्त आहेत.
१. चणे फायबरयुक्त असतात. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली राहते. चणे भिजवून खल्ल्याने कप होण्याची समस्या दूर होते. तसेच चणे भिजत घातलेले पाणी फेकून न देता त्याचे प्राशन करावे, ते आरोग्यासाठी चांगले असते.
२. चणे खाण्यामुळे आपल्याला चांगली ऊर्जा मिळते. चणे गुळाबरोबर खाल्ले तर त्याचा अधिक आरोग्याला लाभ होतो.
अधिक वाचा : तासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश
३. डायबिटीज रुग्णांना चणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
४. अशक्तपणा आलेल्या रुग्णांना चणे अतिशय फायदेशीर आहेत.
५. चणे भिजविलेल्या पाण्याने चेहरा धुतला तर चेहऱ्यावर चांगली चमक येते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.