चणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
Aug 29, 2015, 03:16 PM IST