भारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक

डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.

Updated: Jul 27, 2015, 04:54 PM IST
भारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक title=

कोटा : डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.

याचबरोबर महिलांमध्येही सामान्यतः तिसरा सगळ्यात जास्त दिसणारा रोग हाच आहे.
डोकं आणि मानेचा कॅन्सर किंवा हेड, नेक, स्क्वामॉस सेल कार्सिनोमा (एचएनएससी) ची सुरुवात साधारणता स्क्वामॉस पेशीपासून होते ज्या तोंड, नाक, गळ्यामध्ये असतात. 
तोंडाचा कॅन्सर हा सगळ्या एचएनएससी कॅन्सरर्समध्ये सामान्य आहे, असं या अध्ययनातून समोर आलंय.
सुमारे 50 टक्के रुग्ण याच्या उपचारादरम्यान मृत्यू पावत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.