भारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक

भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.

Updated: Jul 27, 2015, 03:31 PM IST
भारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक title=

नवी दिल्ली : भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.

 ब्रिटेनमध्ये ५८ टक्के तांदूळामध्ये दहापटीने जास्त धोकादायक आर्सेनिक मिळाले आहे, तर भारतातील छत्तीसगढ, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, पूर्व उत्तरप्रदेश आणि झारखंड या सहा राज्यांमधील काही तांदूळात आर्सेनिकची प्रमाण अधिक प्रमाणात आढळली आहे.

 आर्सेनिक हे एक पर्यावरण प्रदूषक आहे. हे नैसर्गिकरित्या मातीतून तसेच पाण्यातून तांदूळाच्या रोपात उत्पन्न होतात. आर्सेनिकची सगळ्यात जास्त प्रमाण आशियातील देशात सापडते, जिथे तांदूळाचे उत्पन्न सगळ्यात जास्त होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.