चांगली बॉडी हवीये...हा आहार घ्या

चांगली आणि परफेक्ट बॉडीसाठी हल्ली जिमला जाण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. मात्र केवळ जिम जाण्याने तुमची बॉडी परफेक्ट होणार नाहीये तर त्यासाठी तितकाच पौष्टिक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जिमला जाणाऱ्यांनी खालील आहार घ्यावा. यामुळे त्यांना नक्कीच परफेक्ट बॉडीसाठी फायदा होईल.

Updated: Dec 26, 2015, 11:09 AM IST
चांगली बॉडी हवीये...हा आहार घ्या title=

नवी दिल्ली : चांगली आणि परफेक्ट बॉडीसाठी हल्ली जिमला जाण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. मात्र केवळ जिम जाण्याने तुमची बॉडी परफेक्ट होणार नाहीये तर त्यासाठी तितकाच पौष्टिक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जिमला जाणाऱ्यांनी खालील आहार घ्यावा. यामुळे त्यांना नक्कीच परफेक्ट बॉडीसाठी फायदा होईल.

संडे हो या मंडे रोज खा अंडे - तुमच्या दिवसाची सुरुवात उकडलेल्या अंडयांनी करा. सकाळच्या न्याहारीदरम्यान अंडी खाल्ल्यास वजन लवकर वाढेल. अंड्यातील पांढऱ्या भागांत प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच झिंक, व्हिटॅमीन, आर्यन आणि कॅल्शियमचा स्त्रोत आहे. 

चिकन ब्रेस्ट(कलेजी) - जिम जाणाऱ्यांच्या आहारात चिकनचा समावेश अत्यावश्यक आहे. प्रत्येक १०० ग्रॅम कलेजीमध्ये ३० ग्रॅम प्रोटीन असते. 

भरपूर पाणी प्या - आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे मांसपेशीची ताकद वाढवण्यासाठी पाणी गरजेचे असते. तसेच एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. 

अननस खा - जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आहारात अननसाचा समावेश नक्की करा. यातील ब्रोमिलीन प्रोटीन पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. 

पालक - जिममध्ये जाणाऱ्या पुरुषांनी आहारात पालकाचा समावेश करावा. शाकाहारीसांठी पालक अतिशय फायदेशीर आहे.

बदाम - सुक्या मेव्यात बदामाला अधिक महत्त्व आहे. ताकद आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. 

फळे, सुकामेवा - मोसमानुसार फळांचे सेवन करा. आहारात अधिक प्रमाणात फळे खा. तसेच सुक्यामेव्याचेही सेवन करा. यामुळे शरीराला चांगले फायदे होतात. यात फॅटचे प्रमाण योग्य असते त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक नसते. त्यामुळे जिम जाणाऱ्यांनी अक्रोड, बदाम, काजू खावेत.