मुंबई: जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरारवर वाईट परिणाम होतो.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचत नाही आणि यामुळे पोट सुटण्याचा धोका निर्माण होतो. डॉक्टरांच्या सर्वेक्षणानुसार 90 टक्के लोकं पाणी प्यायल्याशिवाय जेवत नाहीत.
पुराणामध्येही जेवणानंतर पाणी पिऊ नये, असं लिहून ठेवण्यात आलं आहे. ऋषी वागभट यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिणं म्हणजे विष घेण्यासारखं आहे, असं लिहून ठेवलं आहे. हे पुस्तक लिहिणारे वागभट तब्बल 135 वर्ष जगले.
आयुर्वेदामध्येही जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं लिहून ठेवण्यात आलं आहे. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे जठरावर त्याचा विपरित परिणाम होतो. जठर हे अन्न पचवण्याचं काम करतं.
त्यामुळे जेवणाआधी अर्धा तास पहिले आणि जेवल्यानंतर 2 ते 3 तासानंतर पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती मजबूत होते, तसंच पोटाच्या समस्याही दूर होतात.