बॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.

Updated: Apr 8, 2014, 06:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.
शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्याकडून ‘पाच एस’ फॅक्टर आणणार असल्याचा दावा करण्यात येतोय. सुशिक्षित, सुसंस्कृत, सुस्वस्थ, सुरक्षित आणि समृद्ध अशा गोष्टी आणणार असल्याचा दावा होर्डिंगमधून करण्यात आलाय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने जातीवादी नाही, धर्मवादी नाही, ना भाषावादी फक्त विकास करायचा आहे निर्वादी अशा घोषवाक्याने प्रचार सुरु केलाय.
 
तर मनसेनंही आम्ही काम करणार ‘२४ तास आणि २४ तासात’ या घोषवाक्यानं मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय.
 
ही घोषवाक्य आणि होर्डिंगबाजीवरुन तिन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेत. आपणच वेगळे असल्याचा दावा तिघांकडूनही होतोय. मात्र मतदारराजाचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं रंजकच ठरणार आहे..  
 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.