www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी बिहारच्या राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपलाय. यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन हा राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
तरुण गोगोई यांच्यानंतर राजीनामा देणारे ते बिहारचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. 'लोकसभा निडवणुकीत जेडीयूची खराब कामगिरी दिसली... मी लोकभावनेचा सन्मान करतो... राजीनामा दिला असला तरी विधानसभा बरखास्त करण्याची मात्र शिफारस केलेली नाही' असं यावेळी नीतीश कुमार यांनी स्पष्ट केलं.
मी बिहार विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करणार नाही. माझ्याबरोबर अनेक जण होते. पाच वर्षांसाठी विधानसभा आहे. त्यामुळे मी विधानसभा बरखास्त करणे योग्य नाही. माझ्यावर जी जबाबदारी होती, ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय.
सोबतच त्यांनी मोदी सरकारला शुभेच्छाही दिल्यात... 'या निवडणुकीत जातीच्या आधारावर देशात ध्रुवीकरण झालेलं दिसलं... मोदी सरकारला आमच्या शुभेच्छा... मोदी सरकारनं युवापिढीला दाखवलेली स्वप्नं पूर्ण करावीत... चांगल्या दिवसांचा अनुभव सर्वांना यावा' असंही यावेळी नीतीशकुमार यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभवाची जबाबादारी नितीश कुमार यांनी स्वीकारली असून पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत जदयूला 40 पैकी अवघ्या 2 जागा मिळाल्या. या पराभवाची नैतिक जबाबादारी नितीश यांनी स्वाकारलेय.
बिहारचे मुख्यमंत्री पद सोडून सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय घेत त्यांनी राज्यापालांकडे राजीनामा सोपवला.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबलावर एक नजर
जेडीयू - 115 जागा
भाजप - 91 जागा
राजद - 22 जागा
काँग्रेस - 4 जागा
इतर - 11 जागा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.