www.24taas.com, मुंबई
कमी झालीय का राजकीय संघर्षाची धार ?
पुन्हा निर्माण झालाय का नात्याचा जिव्हाळा ?
एकत्र येणार का ठाकरे बंधू ?
संघर्षाकडून समेटाकडे ?
जिव्हाळा कायम आहेच.. फक्त सारेच वाट पाहत होते, पहिला कौतूकाच शब्द कोण बोलतो यावर... राज ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाचं आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच कौतुक करून दोन्ही बंधुंत कौटुंबीक पातळीवर वाढलेला जिव्हाळा आता राजकारणातही वाढत असल्याचे संकेत दिले.... आणि ठाकरे बंधुंची वाटचाल आता संघर्षाकडून सलोख्याकडे होऊ लागलीय.... अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधुंचा राजकीय संघर्ष गेली काही वर्षे अनुभवलाय.... एकमेकांवर टीका करताना वैराचं टोक गाठल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात दोन्ही बंधू एकत्र आले.... आता मुंबईत सीएसटीच्या हिंसाचारानंतर त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी सर्वच पक्षांत स्पर्धा लागली असताना आणि त्यात राज ठाकरेंनी प्रचंड मोर्चा काढून आघाडी घेतली.... असं असताना राजकीय स्पर्धा विसरून उद्धव ठाकरेंनीही या मोर्चाचं कौतुक केलंय....शिवसेनेच्या मुखपत्रात राज यांच्या मोर्चाला पहिल्या पानावर ठळक प्रसिद्धी देण्यात आली.... शिवसेनेनं त्याचं समर्थनही केलं....
पण खुद्द उद्धव ठाकरेंनी केलेलं कौतुक ठाकरेंवर प्रेम करणा-या चाहत्यांना अधिक सुखावणारं आहे.... शिवसेना आणि मनसे या दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं वेगळं अस्तित्व आहे..... ते जपायचं तर स्पर्धा आणि राजकारण तर होणारच.... पण टोकाला गेलेला संघर्ष तूर्तास तरी शमलाय.... एरवी पत्रकार परिषदेत एकमेकांचे नाव जरी पत्रकारांनी उच्चारलं तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देणा-या ठाकरे बंधुंच्या बोलण्यात आता ती कटूता दिसत नाही.... दोन्ही बंधू एकत्र येणार का ? हा प्रश्न तर ते हमखास उडवून लावायचे.... पण आता मात्र या प्रश्नावरचं उत्तर बदललंय..
ठाकरे बंधुंची बदललेली भाषा लक्षात घेतली तर भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येऊन राजकारण करतील का याची चर्चा अर्थातच जोर धरू लागलीय.... आताच त्यावर काही बोलणं घाईचं ठरेल, पण सुरुवात तर तशी दिसतेय... राज आणि उद्धव ठाकरेंमधला संघर्ष शमल्यानं शिवसेना आणि मनसे भविष्यात निवडणुकीत एकमेकांना साथ देणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय....
तसं झालं तर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पालटू शकतं, पण दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता तूर्तास तरी नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.. गेली सात वर्षे ज्यांच्यात विस्तवही जात नव्हता, ते ठाकरे बंधू महिनाभरापूर्वी एकत्र दिसले.... नात्यातला ओलावा पुन्हा पहायला मिळाला..... संघर्षाची धार कमी झाली.... उद्धव यांच्या वाढदिवसाला राजनी पुष्पगुच्छ पाठवून अभिष्टचिंतन केलं.... कटुता संपून जिव्हाळा वाढला आणि मग चर्चा सुरू झाली ती त्यांच्या पुढच्या राजकारणाची....
राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटवून टाकेल एवढी नक्कीच आहे.... राजकारणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यानं दोघांचंही नुकसान झालंय.... पण दोघांनीही आपआपली क्षमताही सिद्ध केलीय.... अग्नीपरीक्षा दिल्यानंतर आपआपल्या पक्षांचं अस्तित्व कायम ठेवून दोन्ही बंधू एकत्र येतील का ?...
नजिकच्या काळात निवडणुका नसताना उद्धव ठाकरेंनी तरी या प्रश्नाचं उत्तर असं दिलंय.... असा प्रश्न आला की राज ठाकरेही तो उडवून लावायचे.... पण आता पूर्वीचा तो तिरस्कार दिसत नाही... दोन्ही बंधू एकत्र येतील असं राजकीय विश्लेषकांना वाटतं नाही.... दोघं बंधू वेगळं अस्तित्व ठेवतील आणि निवडणुकीनंतर गरज लागली तर एकमेकांना साथ देतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते....
निवडणुकीचं मैदान अजून दूर आहे.... मधल्या काळात काय घडामोडी घडतील यावर बरंच काही अवलंबून आहे....
मतभेद विसरुन दबाव वाढायला हवा, असा सूर राज यांनी व्यक्त केलाय.. पण काही महिन्यापूर्वींच चित्र परस्परविरोधी असचं होतं.. झेंडा पासून अजेंडा पर्यंत, प्रत्येक गोष्टीत संघर्ष दिसला होता.. आता मात्र
ठाकरे बंधूमधील संघर्षाची धार कमी झाली असल्याचं सध्या दिसत असलं तरी, काही महिन्यापूर्वी चित्र काही वेगळचं होतं... मराठी माणसांचा खरा कैवारी कोण ?