www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. `लेक लाडकी` अभियानांतर्गत वर्षा देशपांडेंच्या सहकार्याने हा पर्दाफाश करण्यात आला.
सुभाष भोपळे या डॉक्टरनं दहा हजार रुपये घेऊन लिंगनिदान केल्याचं उघड झालंय. भोपळे हा शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या तालुका संघटक सुलभा भोपळे यांचा पती आहे. झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर भोपळे आणि त्याचा मुलगा डॉक्टर परेश या दोघांना तहसिलदार आणि पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारवाई केलीय. डॉ. भोपळेकडे मोबाईल सोनोग्राफी मशीनही आढळली आहे.
मोबाईल सोनोग्राफी मशीन वापरायला राज्यात बंदी असतानाही मे महिन्यात परवान्याचे नुतनीकरण झाले होते. त्यामुळे आरोग्यअधिका-यांचा डॉ. भोपळेवर वरदहस्त आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय.