वेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक

'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.

Updated: Nov 25, 2011, 08:38 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

'कसोटी जिंदगी की'  या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान  या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय.दिवसाला अभिनय करणारी ही अभिनेत्री रात्रीच्या अंधारात तासाला लाखो रुपये कमवायची. कारण तीने अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं. पुणे पोलिसांनी तीचा पर्दाफाश केलाय.

 

पुण्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा मारुन पोलिसांनी अभिनेत्री आजरा जानला वेश्याव्यवसाय केल्याप्रकऱणी  रंगेहाथ अटक केलीय. 'कसोटी जिंदगी की'सह अनेक सिरीयलमध्ये अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीचा खरा चेहरा समोर आल्याने पुण्यात एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी अभिनेत्री आजरासह स्पॉटबॉय नीरज बदाणीलाही गजाआड केलंय. स्पॉटबॉय नीरज हा दलालाचं काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातल्या काही हॉटेलमध्ये मुंबईतील अभिनेत्री वेश्याव्यवसाय करत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी हॉटेलवर पाळत ठेवायला सुरुवात  केली होती आणि त्यांना मिळालेली माहिती खरी ठरली. पोलिसांनी घटनेच्या दिवशी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.पोलिसांनी आजरा जान ला रंगेहाथ अटक केलीय.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आजरा जान हिने कसोटी जिंदगीसह अनेक सीरियलमध्ये काम केलय. आजरा जान ही मूळची जम्मु काश्मीरची असून  स्पॉट बॉय नीरज बदाणी हा मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. आता हे दोघेही मुंबईमध्ये राहायला आहेत. आजरा आणि तीच्यासोबत अटक केलेला स्पॉटबॉय नीरज हे अत्यंत चलाख आहेत.आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये यासाठी मुंबईहून बाहेर ठिकाणी जायला भाड्याच्या गाडीचा वापर करायचे. पोलिसांनी या प्रकऱणी अधिक चौकशी केली असता आरोपी नीरज बदाणी हा यापूर्वीही या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये येऊन गेला असून त्याच्या नावावर याआधीही अनेकवेळा रुम बुक करण्यात आलं असल्याचं पोलिस तपासात उघड झालंय. पोलिसांनी या प्रकऱणी आरोपींच्या विऱोधात गुन्हा दाखल केला असुन त्यांना न्यायालयासमोर हजर कऱण्यात आलं. या प्रकरणाच्या व्याप्तीचा तपास करून मुखवट्याआड लपलेल्या आणखी काही खऱ्या चेहऱ्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी पोलिसांवर आलीय.