बारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७  जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2017, 09:41 PM IST
बारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल title=

मुंबई : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७  जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते. पण आता लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाकडून बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. निकालाची तयारी सुरू आहे.  विभागीय मंडळांची कामे पूर्ण न झाल्याने निकालाला थोडा उशीर होत आहे.

निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडेळातर्फे करण्यात आलेय.

दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बसले  आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.