फेसबुकवरही सचिनचा विक्रम, एक तासात ४,१०,००० फ्रेंड्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 10, 2012, 04:32 PM IST

www.24taas.com, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनने फेसबुक जॉइन केल्यावर पहिली पोस्ट टाकली, त्यात त्याने लिहिलं होतं, हॅलो मित्रांनो, फेसबुक परिवारात तुमचं स्वागत... लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, की देशासाठी मी भारतीय टीमतर्फे क्रिकेट खेळावं आणि २२ वर्षांनंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला. हे देखील माझं एक स्वप्न होतं. तुमच्या पाठिंब्याशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
यापुढे सचिन असंही म्हणाला, मी माझे नुभव तुमच्याबरोबर वाटत राहीन. माझ्यासोबत फेसबुकवर या. एकमेकांशी अनुभव शेअर करण्याचा प्रवास आपण चालू ठेवू. सचिनचं हे ऑफिशियल पेज सेवनथ्रीरॉकर्स हाताळेल. या पेजची लिंक अशी-(https://www.facebook.com/SachinTendulkar)