www.24taas.com, झी मीडिया, कटक
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्यात तुलना केली आहे.
कटकमध्ये बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात दमदार खेळी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्यात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखी गुणवत्ता आहे, असं महेंद्रसिंह धोनी याने म्हटलंय.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 38 चेंडूत 90 धावांची खेळी केली, तसेच या सामन्यात पंजाबकडून चेन्नईला 44 धावांनी पराभव पत्करावा लागला.
धोनी म्हणाला, मॅक्सवेल एका पाठोपाठ एक षटकार खेचल्याने त्याच्यामधील गुणवत्ता दिसली, ``मॅक्सवेलची फलंदाजी अप्रतिम होती. त्याच्यामुळे इतर फलंदाजांनाही पाठिंबा मिळाला.
सचिन आणि सेहवाग हे आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट काळात जशी फलंदाजी करत होते, तशीच फलंदाजी मॅक्सवेल करत आहे. आमच्या फिरकी गोलंदाजांनी दुसऱ्या टप्प्यात खूप धावा दिल्यानेच आमचा पराभव झाला, असं धोनीने सामन्या संपल्यानंतर बोलतांना सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.