`त्या दिवशी सलमान दारु प्यायलेला नव्हता`

‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 21, 2014, 08:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय. याच शेजाऱ्यानं घटनेच्या दिवशी सलमान खानला गर्दीपासून सोडवण्यासाठी मदत केली होती.
28 सप्टेंबर 2002 रोजी बांद्र्यात एका दुकानात सलमानची गाडी एका दुकानात घुसली होती. या घटनेत या दुकानाच्या बाहेर झोपलेल्यांपैकी एक व्यक्ती ठार झाला होता आणि इतर चार जण जखमी झाले होते.
घटनास्थळावरून जवळच राहणाऱ्या आणि सलमानचा मित्र असणाऱ्या 63 वर्षीय फ्रान्सिस फर्नांडिसनं सत्र न्यायाधीश डी डब्ल्यू देशपांडे यांच्यासमोर आपला जबाब नोंदविला. लोकांचा आवाज ऐकल्यानंतर आपणं घटनास्थळाकडे धाव घेतील. लोकांनी हातात काठ्या आणि दगड घेऊन सलमानला घेरलं होतं.
फर्नांडिस यांच्या म्हणण्यानुसार, ते सलमानला त्याच्या लहानपणापासून जाणतात आणि याच भागत राहतात जिथे सलमान राहतो आणि जिथं ही घटना घडली. सलमानला दिलासा देत फर्नांडिस यांनी ‘सलमान नशेत दिसत नव्हता. मी जेव्हा त्याच्याजवळ गेलो तेव्हा मलाही दारुचा वास आला नव्हता. तो खूप नॉर्मल दिसत होता आणि सरळ चालत होता’ असं म्हटलंय. फर्नांडिसनं सलमानचे वकील श्रीकांत शिवाडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सलमानच्या बाजुनं साक्ष नोंदवलीय.
मी सलमानजवळ गेलो तेव्हा त्याला बरे वाटले. मला पाहताच तो म्हणाला, ‘कमांडर मुझे बचा लिजिए’. सलमानची ही विनंती ऐकून मी त्याला त्याच्या घराच्या दिशेला नेले. माझ्या पत्नीने सलमानला त्याच्या गाडीत बसायला सांगितले आणि घरी जा असे म्हणालो. आणि त्याने तिचे म्हणणे ऐकले. तो गाडीत बसला आणि स्वत:च्या घराकडे निघून गेला असेही फर्नांडिस यांनी सांगितले. लोकांच्या हातात काठ्या आणि दगड पाहून सलमानचा जीव धोक्यात आहे हे आपल्याला लक्षात आले. त्यामुळेच मी त्याला सुखरूप बाहेर काढले, अशी माहितीही फर्नांडिस यांनी दिली
यावेळी न्यायालयाच्या कक्षात उभा राहून सलमान हे सगळं ऐकत होता. नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान करून सलमान खान आपल्या अंगरक्षक आणि अलवीरा-अर्पिता या आपल्या दोन बहिणींसह न्यायालयात उपस्थित झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.