www.24taas.com, मुंबई
सिने अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार आहे. २००२ साली झालेल्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी त्याच्याविरोधात हा खटला चालणार आहे. या खटल्यात सलमान १० वर्षांसाठी तुरुंगातही जाऊ शकतो.
वांद्र्याच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत. ११ मार्चला सलमानला कोर्टात राहण्याचं समन्सही बजावण्यात आलाय. सदोष मनुष्यवधाचा खटला सत्र न्यायालयात चालणार असल्यानं आता त्याला सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर राहावं लागेल. सलमान यात दोषी आढळल्यास त्याला जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
१० वर्षांपूर्वी सलमानच्या एसयूव्ही या गाडीनं एका मुंबईतील बेकरीला धडक दिली होती. या घटनेत जवळच्याच फुटपाथवर झोपलेल्या एकाला आपला जीव गमवावा लागला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते. सलमानवर बेदरकारपणे गाडी चालवण्याबरोबरच सदोष मनुष्य वधाच्या गुन्हाही नोंदवला गेलाय.