या शुक्रवारी अनेक सिनेमांची मेजवानी

उद्या अतुल-सागरीकाची ‘प्रेमाची गोष्ट’ भेटीला येत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या मराठी सिनेमात अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यानिमित्ताने हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसत आहे. तर अतुल कुलकर्णीची ही पहिलीच रोमॅण्टिक फिल्म आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 31, 2013, 07:56 PM IST

www.24taas.com, मुंबई
उद्या अतुल-सागरीकाची ‘प्रेमाची गोष्ट’ भेटीला येत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या मराठी सिनेमात अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यानिमित्ताने हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसत आहे. तर अतुल कुलकर्णीची ही पहिलीच रोमॅण्टिक फिल्म आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाची गाणीही लोकप्रिय झाली आहेत. आता प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडते का हेच पाहायचं..
आशा भोसलेंच्या सुरांची मोहिनी सर्वांवर आहेच पण त्यांचा अभिनयही पाहायला मिळणार आहे ‘माई’ या सिनेमात. माई या हिंदी सिनेमात आशा भोसले पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर दिसतील. एका माईची हृदयस्पर्शी कहाणी सिनेमात पाहायला मिळेल..
तर ‘डेव्हिड’ हा थ्रिलरही वीकेण्डला दाखल होतोय. बीजॉय नाम्बियारच्या या सिनेमात नील नितीन मुकेशची आव्हानात्मक भूमिका आहे. डेव्हिड नाव असलेल्या तीन जणांच्या आयुष्यावर सिनेमाची कहाणी बेतली आहे. दिप्ती नवल आणि फारूक शेख ही गुणी जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर पाहायला मिळेल ‘लिसन अमाया’ या सिनेमात. तर सलमान रशदी यांच्या पुस्तकावर आधारीत ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ हा सिनेमाही प्रदर्शित होतोय.
एकंदर विविध शैलीतले अनोख्या विषयांचे सिनेमे या वीकेण्डला रिलीज होणार आहेत.