www.24taas.com, जोधपूर
चिंकारा शिकार प्रकरणी तब्बल १४ वर्षांनी सलमान खानला स्थानिक न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत सलमानला कोर्टासमोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सत्र न्यायालयाने सलमान खान वाइल्डलाइफ ऍक्ट, द आर्म्स ऍक्ट तसंच आयपीसीच्या धारा लावून दोषी असल्याबद्दल शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच त्याच्यासोबत त्यावेळी असणाऱ्या तब्बू, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे यांना वाइल्डलाइफ ऍक्ट आणि आयपीसी अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्म्स ऍक्ट आणि आणि आयपीसीमधून सलमानला मुक्त केलं होतं. उर्वरीत काही कलमांमधूनही मुक्त करण्यासंबंधी यावर याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी करताना जोधपूर हायकोर्टाने जुनी कलमं तशीच ठेवत त्यांच्यावर आणखी काही कलमं ठेवण्यात आली आहेत.
१ आणि २ ऑक्टोबर, १९९८ रोजी ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नामशेष होत चाललेल्या प्रजातीतील दोन चिंकाऱ्यांची सलमान खानने शिकार केली होती. जोधपूर जवळील कांकणी या गावात त्याने ही शिकार केली होती.
तपासाअंती या घटनेमध्येमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना ४ फेब्रुवारी पर्यंत कोर्टात हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आरोपी यापूर्वी १९ जुन २००६ रोजी न्यायालयात हजर झाले होते.