करीना-कतरिनाचा `न्यू इयर पार्टी`त थिरकण्यास नकार

नवीन वर्षाच्या स्वागताला बॉलिवूड सेलिब्रिटींनी थिरकणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. बड्या बड्या हॉटेल्समध्ये नामवंत सेलिब्रिटींना न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेक ऑफर्स असतात. मात्र यंदा या ऑफर्समधून कतरिना आणि करीनाने काढता पाय घेतलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 10, 2012, 06:28 PM IST

www.24taas.com, मुंबई
नवीन वर्षाच्या स्वागताला बॉलिवूड सेलिब्रिटींनी थिरकणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. बड्या बड्या हॉटेल्समध्ये नामवंत सेलिब्रिटींना न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेक ऑफर्स असतात. मात्र यंदा या ऑफर्समधून कतरिना आणि करीनाने काढता पाय घेतलाय.

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये थिरकण्यासाठी जास्तीत जास्त मानधनाची ऑफर कोण आपल्या नावे करतंय यासाठीच बॉलिवूडमध्ये चढाओढ पहायला मिळते.बॉलिवूडच्या साऱ्याच तारकांची या ऑफर्ससाठी रेस लागते. यावर्षी मात्र हे चित्र काही वेगळं पहायला मिळतंय. शीला आणि चिकनी चमेली हिट झाल्यानंतर या वर्षी कतरिनाच्या डान्स परफॉर्मंसना सॉलिड डिमांड आहे. त्यासाठीच तिला सात ते आठ ऑफर्संही आल्यात. विशेष म्हणजे या ऑफर्समध्ये मानधनाचा आकडाही 4 ते 5 कोटी इतका आहे. मात्र कतरिनानं चक्क या वर्षी आपण ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी लंडनला जाणार असल्याचं सांगत या ऑफर्स नाकारल्यात. त्यामुळे या चिकन्या चमेलीची झलक आपल्याल या न्यू इयरला तरी मिळणार नाही.
बॉलिवूडची दुसरी ग्लॅमरस तारका करीना कपूरनंही डिसेंबरमध्ये व्हेकेशनसाठी जाणार असल्याचं सांगत काही कोटींच्या ऑफरवर चक्क पाणी सोडलंय. त्यामुळे हलकट जवानी आणि फेव्हीकॉल या हिट गाण्यांवर यंदाच्या न्यू इयरला बेबो ताल धरताना दिसणार नाही. आता या दोन ग्लॅमर गर्लसच न्यू इयरला थिरकणार नाहीत म्हटल्यावर न्यू इयरच्या ग्लॅमरस परफॉर्मंसेसची तहान दुय्यम आयटम गर्ल्सच्या परफॉर्मंसवर भागणार आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात चांगली वाढ झालेली आहे.