www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मिलिअन डॉलर स्माईल असलेली माधुरी दीक्षित आणि हवाहवाई श्रीदेवीमध्ये सध्या टशन पहायला मिळतेय. झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय.
‘इंग्लिश विंग्लिश’ म्हणत श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा या हवाहवाईनं आपल्या तालावर प्रेक्षकांसह संपूर्ण बॉलिवूडला थिरकायला भाग पाडलं. तर ‘आजा नच ले’ या सिनेमातून माधुरीनं बॉलिवूडमध्ये पुनरागमन जरी केलं असलं तरी तिची खरी दखल घेतली ती स्मॉल स्क्रीननं. मात्र, सध्या माधुरीच्या डेढ इश्किया आणि गुलाब गॅँग या दोन सिनेमांची जोरदार चर्चा आहे.
90 च्या दशकातल्या या नंबर वनच्या दोन्हा हिरोईन्समध्ये आता मात्र, टशन पहायला मिळतेय. नेमकी ही टशन कशासाठी आहे? करिअरच्या या टप्प्यावर दोघींमध्ये टशन असण्याचं कारण तरी काय? तर झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये टशन असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारण्यासाठी माधुरी आणि श्रीदेवीच्या नावाची चर्चा आहे. सोने पे सुहागा म्हणजे या दोघींच्याही आवडत्या अभिनेत्याला अर्थातच अनिल कपूरला रणवीरच्या वडिलांची भूमिका ऑफर करण्यात आलीय.
खरं म्हणजे, श्रीदेवी आणि माधुरी दोघीही वास्तविक जीवनातही आईचाच रोल निभावतायेत. मात्र, आता रणीवरच्या आईचा रोल पडद्यावर साकारण्याची संधी या दोघींपैकी कोणाला मिळणार याचीच वाट पाहूया.